प्रणिती शिंदेंनंतर आता राम सातपुते ही भेटीला ; महादेव कोगणूरे यांचे महत्व वाढले
सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार अतिशय जोराने सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळतात. उमेदवारांच्या भेटीसाठी सुद्धा दिसून येतात. सोलापुरात सध्या एक नाव अतिशय चर्चेचे ठरत आहे. त्याला कारणही तसेच असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दोनही आमदारांनी त्यांची भेट घेतली आहे ते नाव म्हणजे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे होय.
सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठोपाठ आता भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली.आता लोकसभेचे दोन्ही उमेदवार महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन दखल घेताच एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यात उत्साहा संचारला आहे.
महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्यामुळे दांडगा जनसंपर्क वाढला आहे. त्यातच महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भुमिका अजूनही जाहीर न केल्याने आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महादेव कोगनुरे यांची दखल घेताना दिसून येत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून महादेव कोगनुरे यांनी एम के फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात नि:स्वार्थ भावनेने जनमाणसांची सेवा करताना दिसतात. यामुळेच महादेव कोगनुरे यांचे समाजात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. महादेव कोगनुरे यांनी ही राजकारणात राहून समाजकार्य करीत जनमानसांच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या पक्षाला साथ देण्याची भुमिका महादेव कोगनुरे घेणार असल्याचे बोलले जात आहे.