सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी शनिवारी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे या रुजू झाल्या. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. रविवारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी होती. त्यानिमित्त त्या अभिवादनाला कार्यालयात आल्या त्यानंतर जिल्हा परिषदेच्या परिसराची पाहणी केली प्रचंड अस्वच्छता दिसली. ते सर्व साफ करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी केल्या.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सीईओ मनीषा आव्हाळे यांचे जिल्हा परिषदेमध्ये आगमन झाले. त्यानंतर लगेच त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला बसल्या नंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला जाऊन आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यालयाबाहेर अधिकारी, व विविध कर्मचारी संघटना यांची प्रचंड गर्दी होती. परंतु त्यांनी सत्कार स्वीकारण्यापेक्षा आपल्या कामाला प्राधान्य दिले. त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला.
बराच वेळ कार्यालयाबाहेर सत्काराला अनेक जण थांबले हे कळाल्यानंतर मात्र काहींना त्यांनी दालनात बोलावून सत्कार स्वीकारले. यामध्ये नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीने सुप्रिया जगताप यांनी आव्हाळे यांना स्वतः फेटा बांधून त्यांचा सत्कार करत एक महिला म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.
कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, शिक्षणाधिकारी संजय जावीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर व त्यांचे सहकारी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने विवेक लिंगराज व त्यांचे सहकारी जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक दोन च्या वतीने गिरीश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केला.
उत्तर तालुक्यातील भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील, अकोलेकाटीच्या सरपंच अंजली क्षिरसागर राळेरासचे सरपंच नागनाथ माने, नांदणी सरपंच शिवानंद बंडे, विकास पाटील, महेंद्र खटके सदस्य नरोटोवाडी यांनी नूतन सीईओ आव्हाळे यांचा सत्कार केला.