सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभागात बराच गोंधळ असल्याचे चर्चा आहे. त्या विभागाचा कारभार संशयास्पद असून या विभागामध्ये कडक शिस्तीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या कधी लक्ष घालणार असा प्रश्न दिव्यांग संस्थेतील कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
या विभागातील माहिती अधिकाराची बरीच प्रकरणी प्रलंबित आहेत. माहिती अधिकारातून माहिती दिली जात नाही एखाद्या विषयाची माहिती मागितल्यास दिशाभूल करून तो अर्ज दिव्यांग संस्थेकडे वर्ग केला जातो त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
दिव्यांग संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर केल्या जात नसल्याची तक्रारी आहेत सातव्या वेतन आयोगातील शिक्षकांची फरक रक्कम वेगळ्या उद्देशाने व्यवहारातून दिली जात असल्याची माहिती काही शिक्षकांनी कॅमेऱ्यासमोर न येता दिली आहे. वेतन जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून या वेतनाच्या पैशातून सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला जातो त्यामुळे पगारी दोन ते तीन महिने केल्या जात नाहीत अशी ओरड समोर आली आहे.
दिव्यांग विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अधिकाऱ्याच्या कामकाजाच्या अनेक तक्रारी आहेत. ते टेबलावर नसतात याबाबत समाज कल्याण अधिकारी खमीतकर यांनी अनेकवेळा नकळत पत्रकारांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. ते आपले कार्यालय सोडून जिल्हा परिषदेच्या मागच्या बाजूला असलेल्या अभिलेख गृहाकडे कायम मोबाईलवर बोलत असतात, अनेकांना भेटत असतात असे इतर कर्मचाऱ्यांना दिसून आले आहे तिथे जाण्यामागील त्यांचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत असून त्या भागातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.