महाराष्ट्रातील सरकार दर वर्षी जून जुलै महिन्यामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम घेतो, 2014 ते 2019 दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला होता त्या पद्धतीने प्रत्येक वर्षाला संपूर्ण राज्यात वृक्षारोपण झाले, कोट्यावधीचा निधी या योजनेत खर्च करण्यात आला .सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले मात्र त्यापैकी किती झाडे जगली हा खरा तर संशोधन करण्याचा विषय आहे, आता आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने सुद्धा राज्यभरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे.
मात्र सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याच पार्श्वभूमीवर एक नवीन संकल्पना समोर आणली, एक पद, एक वृक्ष या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील सुमारे पंधरा हजार अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सरपंच यांनी एकच झाड लावायचं आम्ही ते वर्षभर सांभाळायचे ही जबाबदारी देण्यात आली.
दिलीप स्वामी यांचा हा उपक्रम सध्या जिल्ह्यात एक प्रकारची चळवळ झाल्याचे चित्र आहे. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत शेकडो वृक्ष लावले आहेत, झेडपी c.e.o. स्वामी यांचा हा उपक्रम आता महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंगीकारला असून शहरांमध्ये जितकी शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत त्या सर्व निवासस्थानासमोर प्रत्येकी एक झाड असे एकूण 105 वृक्षाची लागवड मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद काशीद यांच्या उपस्थितीत आणि हस्ते लावण्यात आली, ही झाडे जगवण्याची जबाबदारी स्वतः त्या-त्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.



















