सोलापूर : मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूर एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यासह वीज दरवाढ कमी करावी, सेतू सुविधा केंद्रात दाखले त्वरित मिळावेत, वक्फ बोर्ड कडक करावा, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या.
फारुक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरचिटणीस कोमारो सय्यद, माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, अझहर हुंडेकरी, इसामुद्दीन पिरजादे, वाहेदा भंडाले, नसीमा कुरेशी, मोईन शेख, याकूब एम आर, मुस्ताक कानकुर्ती, राजा बागवान, इब्राहिम लालकोट, कमरुल शेख, मोसिन मैंदर्गी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी अध्यक्ष फारूक शाब्दी, कोमारो सय्यद, वाहेदा भंडाले, नसीमा कुरेशी, अझहर हुंडेकरी, गाजी जहागीरदार यांची भाषणे झाली. सर्वांनी मोदी सरकार व मणिपूर सरकारचा निषेध नोंदवला, महिलांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुली नाहीत, महिलांच्या समस्या, दुःख तुम्हाला कधी कळणार असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला आता रिव्हॉल्वर जवळ ठेवण्याची परवानगी द्या अशी जोरदार मागणी केली.