सोलापूर : मार्केट यार्ड परिसरातील हैदराबाद रोडवर शनिवारी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान चौघांच्या टोळीने दोन वाहन चालकांना लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यातील आरोपींची नावे समोर आली असून दुसऱ्या गुन्ह्यात मात्र अज्ञात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील जालिंदर काटे राहणार काठी सावरगाव तालुका तुळजापूर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकाश शिवाजी आगावणे, रा. ढोर गल्ली, तुळजापूर वेस, भवानी पेठ, ओंकार गोविंद, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोनु किर्तीपाल जाधव, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, व गणेश बुवा यादव, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर या चौघां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे शनिवार पहाटे पहाटे ०५.४७ वा चे सुमारास पुणे हैद्राबाद नॅशनल हायवेवर हैद्राबाद कडे जाणाऱ्या हायवे रोडवर शेळगी बीजवर धोत्रेकर वस्ती जवळ त्यांचे ताब्यातील सहाचाकी गाडी क्र. एम एच १२ पी व्ही ७५०९ ही घेवून आले असता, यातील वरील आरोपीतानी एका नंबर प्लेट नसलेल्या हिरो होंडा एच एफ डिलक्स मोटार सायकलवरुन येवून फिर्यादीची गाडी आडवून फिर्यादीस व फिर्यादीच्या सोबत असलेल्या काशीनाथ नातु असे दोघांना हाताने व लाथाबुक्यांने मारहाण करुन, दमदाटी करून संगनमताने सात हजार रुपये रोख व त्यांच्या जवळील दहा हजार किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला आहे.
दुसऱ्या एका गुन्ह्यांमध्ये शनिवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी हैद्राबाद रोड खानचाचा हॉटेल समोर मतिन यासिन यादगिर, मुमताज नगर, कुमठा नाका यांना चौघा अज्ञातांनी लुटले.
ते गैस सिलेंडरने भरलेली गाडी क्र. एम एच १० ए डब्ल्यु ७८७६ ही कुमठानाका सोलापूर येथुन घेवून मार्केट यार्ड मार्ग हुमनाबादकडे निघाले असता, वरील वेळी दोन वाहनवार बसून चार इसम अचानक फिर्यादीचे गाडीसमोर येवून त्यांनी गाड्या आडव्या लावल्या त्यामुळे फिर्यादी गाडी थांबवल्यावर सदरचे चार इसम फिर्यादीजवळ येवून त्यातील एकाने गाडीचा दरवाजा उघडुन फिर्यादीच्या पॅन्टच्या डाव्या खिशात हात घालून फिर्यादीच्या खिशातील वरील वर्णनाची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यातील एकाने गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून अंदाजे १२,००० रुपये चे नुकसान केले आहे. या दोन्ही घटनेचा तपास जोडगाव पेठ पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.