मानवाधिकार संरक्षण, भ्रष्टाचार विरोधी आणि पर्यावरणासाठी देशात कार्य करणाऱ्या हेस वेल्फेअर फाउंडेशनचा महाराष्ट्र प्रदेश मेळावा मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्याला फाउंडेशनचे सर्वेसर्वा ललितेश्वरसिंह बेदी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तुंग, राष्ट्रीय चेअरमन नीरज भल्ला, राष्ट्रीय प्रचार सचिव बापूसाहेब ढगे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास पवार, प्रदेश सचिव अजहर पटेल, महिला प्रदेश अध्यक्ष दिपाली खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यामध्ये आपल्या भागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा शशिकला शिवाजी कस्पटे यांना प्रशस्तीपत्र, मानचिन्ह तसेच प्रोत्साहित राशी बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. कस्पटे यांच्या या सत्कार बद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.