शनिवार 28/10/2023 रोजी सकाळी 9 वाजता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री रूपाभवानी मातेची श्रमनिद्रा असलेल्या मूर्तीची नित्यनेमाने अभिषेक करून देवीची अलंकार पूजा कर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. सायंकाळी नित्यनेमाने पूजन करून व रात्रीची छबिनाची मिरवणूक हलगीच्या कडकडाटासह बँड वाजवून काढण्यात आली.
भक्तांसाठी दूध प्रसाद म्हणून वाटप करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी ट्रस्टी व वहीवाटदार व मुख्य पुजारी मल्लिनाथ रामप्पा मसरे, अनिल मसरे, सुनील मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे, बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ मेंगाणे, जगदीश हिरेहब्बू, ओंकार विभुते, गुरुशांत मोकाशी, अजित साखरे, योगेश लोखंडे, सोमनाथ माळशेट्टी, बसवराज मसरे, अमोल साखरे, निलेश मसरे, जयेश जोशी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.