सोलापूर : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल काढलेले अपशब्द याचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. या विषयात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते रविवारी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भिडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पावसाने हजेरी लावली भर पावसात भिजत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडेंचा निषेध नोंदवला.
आमदार प्रणिती शिंदे यावेळी आक्रमक दिसून आल्या. जाणीवपूर्वक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपमानकारक शब्द वापरले जात आहेत. त्यावर भारतीय जनता पार्टी काहीही बोलत नाही हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे. तुमच्या जर हिम्मत असेल तर शासकीय कार्यालयातील महात्मा गांधी यांचा फोटो काढून दाखवा जर तुम्हाला एवढाच तिरस्कार असेल तर आमचा देश सोडून का जात नाही या शब्दात प्रणिती शिंदे स्पष्टच बोलल्या…