युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात चालत असलेल्या मुलांसाठी न्याय प्रवेश सुनिश्चित करणे प्रकल्प व सम्राट अशोक शैक्षणिक मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल व्यापार प्रतिबंधक हा दिवस साजरा करण्यात आला.
त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून रॅली काढण्यात आली. ही रॅली शाळेच्या प्रांगणातून सुरू होऊन हनुमान मंदिर, निर्मिती रोड या मार्गे परत शाळेत विसर्जित झाली. यामध्ये शाळेतील ३५० पेक्षा जास्त मुला मुलींचा सहभाग होता. रॅलीमध्ये घोषणाबाजी व फलक वापरून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकल्प कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फौंडेशन यु एस यांच्या सहकाऱ्याने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात चालू आहे.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुबोध सुतकर, सहशिक्षक वाघ खानापुरे व महिला शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रदीप नागटिळक, रजनीगंधा गायकवाड यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार योजना कामतकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा ग्राम विकास मंडळ संस्थेचे सुष्मा फडतरे, नितीन ढवळे, दिपाली कांबळे, प्रियंका डावरे, निशिगंधा सर्वगोड यांनी परिश्रम घेतले. बालकांचा अनैतिक व्यापार थांबवा व बाल तस्करी होऊ नये याकरिता दोन दिवस एकाच वेळी २०० जिल्ह्यात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.