सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सध्या रे नगर आणि सुरत चेन्नई एक्सप्रेस या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आपला पूर्ण फोकस ठेवला आहे. दरम्यान सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेसचा विषय सध्या तापला आहे. सोलापूर सह उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी वाढीव मोबदला मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारले असता अगोदर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला घ्यावा त्यानंतर वाढीव देण्याबाबत शासन निश्चितच विचार करेल अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनात सोलापुरातील शेतू कार्यालय सुरू करण्याचा विषय उपस्थित केला त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, सेतू कार्यालय सुरू होण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. जिल्ह्यातील ११ तालुके व शहरात १३ सेतू सुविधा केंद्र आहेत. ही सर्व सुविधा केंद्र चालविणारी सक्षम कंपनी निवडणे आवश्यक असल्याने पूर्वीच्या अटी व शर्थीमध्ये बदल केले आहेत. पुरेशा मनुष्यबळ व सेवा देण्याच्या क्षमता असणारी कंपनी निवडण्यात येणार आहे.