सोलापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावर उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथल्या सीना नदीवर ब्रिज कम बंधारा बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते व विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात शुक्रवारी संपन्न झाले. यावेळी शहाजी पवार, आप्पासाहेब कदम, श्रीमंत बंडगर, सुनील गुंड, राजू सुपाते, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याने होत असलेल्या या कामाचा विषय हा त्यांच्यासाठी अस्मितेचा होता या भूमिपूजन कार्यक्रमाने सर्वाधिक आनंदीत चेहरा सुभाष देशमुख यांचा दिसून आला.त्यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला मी आयुष्यात कधीच भूमिपूजन करत नाही हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे मी माझ्या तत्त्वांना पहिल्यांदाच तिलांजली देत असल्याचं सांगताना तिऱ्हे गावातील तिघांनी मला भूमिपूजन करण्यासाठी हट्ट धरला तो हट्ट काय होता यांचं स्पष्टीकरण बापूनी आपल्या ग्रामीण ढंगात स्टाईलने सांगितले. स्वतःला ते थापाड्या ही म्हणाले, मात्र त्यांच्या बोलण्यामागील उद्देश काय होता पहा हा व्हिडीओ


















