उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे व भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जलजीवन मिशनच्या २ कोटी रुपये कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मौजे सावंतवाडी, बीबी दारफळ येथील गांधी तलावात नूतन विहिरीचे उद्घाटन जिल्हाप्रमुख मनीष काळजे, भाजपचे शहाजी पवार, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आशिष जेटीथोर, युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी, प्रहार औद्योगिक जिल्हाध्यक्ष केशव जांभळे, प्रदीप गवळी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मस्के, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अष्टुळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम गुंड, विकास कोकडे, सचिन जांभळे, आबा शिंदे, सागर यादव, आबा कांबळे, हणमंत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.
हर घर नळ या योजनेप्रमाणे गावातील प्रत्येक घराला पाणी मिळाले पाहिजे, प्रत्येक घराला पाणी मिळवून देण्यासाठी माझे पदाधिकारी आशिष जेटीथोर आणि अतिश गवळी हे दोघे नक्कीच यशस्वी होतील अशी भावना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी बोलून दाखविली.
जल म्हणजेच जीवन यामुळे या योजनेचा योग्य वापर होऊन सर्वांना सोबत घेऊन योजना यशस्वी केली पाहिजे,अडचण कोणतीही असो ती सोडवण्यासाठी मी नेहमी अकोलेकाटीकरांच्या सोबत असेन अशी ग्वाही शहाजी पवार यांनी दिली.
प्रदीप गवळी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाची प्रस्तावना सागर यादव व युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी यांनी केली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष पंकज बोराडे सह सर्व पदाधिकारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
सदर कार्यक्रमास आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्व सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.