भारतीय जनता पार्टीचे निष्ठावन्त कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले हेमंत पिंगळे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीवर नियुक्ती केली आहे. हेमंत पिंगळे भाजप शहर अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांना संधी मिळाली नाही, अनुभवी व 30 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा ते शहराचे सरचिटणीस अशी उत्तम कामगिरी निभावणारे हेमंत पिंगळे यांना संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांत खंत होती.
मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेमंत पिंगळे यांना तुम्ही माझ्यासोबत काम करा, पार्टी ही निष्ठावन्त कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी असून आपण काम करा मी आपणा सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत पिंगळे यांनी यापूर्वी युवा मोर्चा चिटणीस, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, शहराचे चिटणीस व सरचिटणीस अशी विविध जबाबदारी पार पाडली आहे.