सोलापूर : मणिपूर घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष सुनीता रोटे जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
या आंदोलनात शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर मनोहर सपाटे माजी महापौर जनार्धन कारमपुरी, शंकर पाटील, नाना काळे, प्रदेशच्या नलिनी चंदिले, पूनम बनसोडे, राजू कुरेशी, अजित बनसोडे, लता फुटाणे, सरफराज शेख, संगीता जोगधनकर, राहुल बोळकोटे, रेखा सपाटे, गौरा कोरे, युवती शहराध्यक्ष डॉ प्रतीक्षा चव्हाण, गफुर शेख, फारूक मटके यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अध्यक्षा सुनीता रोटे व सुवर्णा शिवपुरे यांनी मणिपूरच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मणिपूर व केंद्र सरकारला महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचे गांभीर्य नाही. मनिपुर घटनेतील त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आमचे आंदोलन असल्याची माहिती त्यांनी दिली.