शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर संस्थेमध्ये सन १९७९ साली संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे पिण्याच्या पाण्याचा कुलर बसविण्यात आला. संस्थेमधील सुमारे १८०० विद्यार्थ्यांना या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा फायदा होणार आहे. आपण ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेला देणे लागतो, हा उदात्त विचार संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून केला जातो याचेच हे प्रतीक आहे.
सदर पाणपोईचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी स्थापत्य विभाग प्रमुख प्रा. सो. की. हुनसीमरद, कर्मशाळा अधीक्षक डॉ. प्रशांत किल्लेदार, विद्युत विभाग प्रमुख प्रा. के. बी. कुलकर्णी, प्रा. श्रीमती संगीता मुनावळी, १९७९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी, संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.