सोलापूर ! शहरातील रखडलेली स्मार्टसीटीची कामे तात्काळ पूर्ण करा अशा सूचना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिल्या.
प्रभाग ४ व ८ मधील स्मार्ट सिटीमधील अपूर्ण रस्त्यांच्या कामाची पाहणी शनिवारी महापौर, सभागृहनेते, नगरसेवकांनी केली. गेली १५ दिवसांखाली सूचना करून सुद्धा कामे पूर्ण होत नाहीत त्यामुळे आयुक्त, सीईओ यांना अलटीमेटम देण्यासाठी शनिवारी महापौर कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी.शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, स्मार्टसीटीचे सीईओ त्रिंम्बक ढेंगळे पाटील, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, ज्ञानेश्वर कारभारी आदी उपस्थित होते.
श्रावण महिना व पावसाळ्याच्या अनुषंगाने रखडलेली कामे पूर्ण करा व त्या भागामध्ये मुख्य बाजारपेठ असल्याने तेथील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत अशी तंबी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्त व स्मार्टसीटीचे सीईओ यांना दिली. दरम्यान बैठकीची अधिक माहिती महापौर एन्नम व सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी दिली..
तसेच विविध सूचना प्रश्न सोडवण्याची मागणी नगरसेवक नागेश भोगडे, अमर पुदाले, विनायक विटकर यांनी केली.



















