सोलापूर : सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली शनिवारी आवळे यांनी सकाळीच आपला पदभार स्वीकारला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना पदभार देऊन खुर्चीवर बसवले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विराजमान होणाऱ्या मनिषा आव्हाळे या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्वेता सिंगल या 10 फेब्रुवारी 2014 रोजी जॉईन झाल्या होत्या. त्यांची बदली केवळ चार महिन्यात म्हणजे 12 जुन 2014 रोजी झाली. त्यांच्यावर टक्केवारीचे आरोप झाले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. त्यामुळे मनिषा आव्हाळे यांच्यासमोर महिला अधिकारी म्हणून आव्हान राहणार आहे.
यापूर्वी आव्हाळे यांना जिल्हा परिषदेमध्ये एक महिना सीईओ पदावर कामकाज केलेला अनुभव आहे. त्यावेळी जल जीवन मिशनच्या कामावर त्यांनी आपला फोकस केला होता. आव्हाळे या थेट आयएएस असल्याने त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे, त्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले उपक्रम त्याची सातत्य टिकवण्याचेही आव्हान आव्हाळे यांच्या समोर आहे. महसूल आणि ग्रामविकास विभागामध्ये कामकाजाची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामविकास विभाग हा थेट ग्रामीण जनतेच्या टच मध्ये असतो या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा कायम वावर असतो.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या सहा विभाग हे प्रभारी अधिकाऱ्यांवर चालत आहेत तसेच कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने अशा वातावरणात आव्हाळे यांना कामकाज करावे लागणार आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, समाज कल्याण, सामान्य प्रशासन या विभागाच्या कामकाज व कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे.
सिईओ मनिषा आव्हाळे यांनी स्वतः पार्किंग परिसरात चालत जाऊन कचरा डेपो ची पाहणी केली. ओला व सुका कचरा वेगळा करणेच्या
सुचना दिल्या. झाडांपासून पडणारा पाला पाचोळा पासून सेंद्रीय खत तयार करून आवारातील झाडे व कुड्यांतील रोपांना घालण्या बाबत सुचना दिल्या. प्रत्येक कार्यालयात होणार कचरा वर्गीकरण करणेचे सुचना दिल्या. कचरा जास्त होणार नाही याची काळजी प्रत्येक विभागाने घेतली पाहिजे अशा सुचना दिल्या.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागास भेट देऊन कार्यालयातील स्वच्छता, निटनेटकेपणा तसेच अभिलेख वर्गीकरण करणे बाबत सुचना दिल्या. या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण व आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व तेथील परिसराची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वानी कार्यालयीन वेळेत व वेळेवर कार्यालयामध्ये उपस्थित रहावे, आपले दप्तर कपाटामध्ये सहा संच पद्धतीने ठेवणेत यावेत. कार्यालयात ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसेल तिथे स्वच्छता करुन घ्यावी. कार्यविवरण नोंदवही अदयावत करावी, दत्पर वर्गीकरण करुन दत्पर अभिलेख कक्षाकडे पाठवावे, आपापल्या विभागाच्या अभिलेख कक्षाची स्वच्छता करुन घ्यावी. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.