सोलापूर ! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सोमवारी प्रवीण वाले यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी जोरदार भाषण ठोकले, कार्यकर्त्यांना पक्षात सन्मान दिला पाहिजे, चुका झाल्या तर त्यांना सांभाळले पाहिजे,तरच पक्षाची ताकद वाढेल, शहर उत्तर मध्ये प्रकाश वाले हे स्वतः पक्षाचे अध्यक्ष असल्याने फार बघावं लागणार नाही, उत्तर मध्ये स्वर्गीय बाबुराव चाकोते, शिवदारे अण्णा यांचे फार मोठे कार्य आहे, बाजार समिती त्यांनी स्थापन केली, अनेकांना रोजगार दिले, व्यापारी बनवले मात्र त्या बाजार समितीची अवस्था बिकट झाली, मार्केट कमिटी भाजपच्या ताब्यात गेली.
शहर उत्तर मध्ये पाणी, रस्ते,ड्रेनेजचा प्रश्न आहे, किती विकास भाजप आमदाराने 15 वर्षात केला, केवळ शिंदे साहेबांवर टीका करायची, आता फक्त यांना धरून ठोकले पाहिजे एवढेच राहिलंय असे खरटमल म्हणाले.


















