१५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना विकास कामासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदरील निधी पारंपारिक धनादेशद्वारे न करता PFMS या आधुनिक बँकीग प्रणालीद्वारे करण्याच्या केंद्र शासनाच्या सुचना आहेत. Public Financial Management System या प्रणालीद्वारे ग्रामसेवक व सरपंच हे त्यांचे Digital Signature चा वापर करुन काम केलेल्या कंत्राट दाराच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करु शकतात. सदरील प्रणालीद्वारे ग्रामपंचायतीचा आर्थीक व्यवहार मोठया प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. ग्रामपंचायतीचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी नेमका कोणत्या कामावर कोणत्या कंत्राट दारास व किती रक्कम हे सर्व एकाच क्लिकवर उपलब्ध झालेले आहे. कंत्राट दाराने केलेल्या कामाचे फोटो, लॅटलॉग, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता अपलोड केले शिवाय निधी हस्तांतरीत करता येत नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सदर PFMS प्रणालीची उपयुक्ता पाहुन सदर प्रणाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ लागू करण्याच्या सुचना दिल्या व त्यास अनुसरुन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सर्व सरपंच, सर्व ग्रामसेवक, सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक, सर्व विस्तार अधिकारी व सर्व गट विकास अधिकारी यांचे करिता ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक १७ जून २०२१ रोजी Video Conference द्वारे आयोजित केले. सदर प्रशिक्षणात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रणालीच्या उपयुक्ततेबाबत व प्रत्यक्ष व्यावहारीक वापरबाबत सखोल मार्गदर्शन केले. सर्व सरपंचाना येत असलेल्या शंकेचे/अडचणीचे समाधान केले.
सदरील प्रशिक्षणाकरिता जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व इतर संबंधीत मिळुन २५०० अधिकारी/कर्मचारी VC करिता Join झाले.
सदरील प्रशिक्षणा पूर्वी कोरोना मुक्त गांव स्पर्धेचे देखील प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) चंचल पाटील यांनी सर्वांना सूचना देण्यात आलेले आहे. कोरोना मुक्त गांव स्पर्धा करिता शासनाने निर्धारित केलेल्या २२ गुणांकणावर कार्यवाही करुन विभागात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामंपचार्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविण्या करिता विशेष नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आले. तसेच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पदनिहाय एक वृक्षलागवड करून त्याचे संगोपण करण्याच्याही सुचना देण्यात आल्या.