सोलापुरातील देगाव येथे आरोपी भारत अंबादास तुपारे वय वर्षे 65, राहणार न्यु. लक्ष्मी चाळ, देगाव रोड, रिलायन्स मार्केट समोर,सोलापूर यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून
बेकायदेशीर,विनापरवाना सिलबंद मॅक्डोनोल नंबर 1 व्हीस्की 180 मिली लिटरच्या बाटल्या, इंपेरिअल विस्की ब्लु 180 मिली लिटरच्या बाटल्या, टैंगो पंच कंपनीची देशी दारु 90 मिली लिटरच्या बाटल्या अशा एकूण 135 बाटल्या,त्यांची एकुण किंमत 8 हजार 500 रुपये तसेच सोबतच एक काळया निळ्या रंगाची एम.एच. 13 बी.सी. 9415 या क्रमांकाची हिरों होन्डा पॅशन प्रो दुचाकी वाहन असे एकूण 38 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल सलगर वस्ती पोलिसांनी जप्त केला.
विक्री करण्याचे उद्देशाने आरोपीने स्वताचे कब्जात असलेले प्रोव्हीशन मालासह मिळुन आल्याने आरोपी विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम 65 (ई) प्रमाणे सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास सलगर वस्ती पोलीस करीत आहेत.




















