मोहोळ | शेतामध्ये गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी अनगर गावच्या शिवारात धाड टाकत मोहोळ पोलिसांनी ६६ किलो गांजा जप्त करीत गांजाची ६५ झाडे हस्तगत केली आहेत. सदर गांजांची किमंत ६ लाख ८५ हजार ५०० रुपये असुन ही कारवाई १२ जुलै रोजी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केली.
मोहोळ पोलिसांचे डीबी पथक अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करत असताना अनगर गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. माहीती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह अनगर येथील रेल्वे रुळा लगत असणाऱ्या हनुमंत शिंदे यांच्या शेतात छापा टाकला आसता हणुमंत धर्मा शिंदे वय ५५ राहणार अनगर यांनी आपल्या शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावुन त्याची विक्री करीत आसल्याचे आढळुन आले. त्या वेळी सदर ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीची तब्बल ६५ गांजाची झाडे मिळून आली. त्याचे वजन ६६ किलो असुन तो गांजा जप्त केला असुन त्याची किमंत ६ लाख ८५ हजार ५०० आहे .
यावेळी पोलिस पथकाने सदर गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले असून गांजाची झाडे जप्त केली आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत कदम, युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी ,पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रविद्र बाबर, हरीष थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर ठिकाणी पंचनामा करणे साठी तहासिलदार जीवन बनसोडे, पो. नि अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे व सरकारी पंच उपस्थित होते .



















