सोलापूर ! शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर चौगुले यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी स्वतः सुशीलकुमार शिंदे,आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार काँग्रेस ओबीसी प्रदेश सचिव सुशील बंदपट्टे, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंकर चौगुले हे सोलापुरातील वडार समाजातील मोठे नेते आहेत ते सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक असून मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत, महाराष्ट्र ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवनामध्ये शंकर चौगुले यांनी त्यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी वडार समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे त्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे इतर राज्यांमध्ये वडार समाजाचा अनुसूचित जातीमध्ये असताना महाराष्ट्रामध्ये हा समाज ओबीसी मध्ये गणला जातो असा मुद्दा माळी यांच्यासमोर उपस्थित केला होता, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत याविषयी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी बैठक लावावी अशी मागणी चौगुले यांनी माळी यांच्यासमोर केली होती.
चौगुले काही दिवसांपूर्वी काँग्रेस भवनात आले लगेच चार ते पाच दिवसात त्यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चौगुले यांच्या प्रवेशानंतर शहर ओबीसी विभागाच्या विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्याचे पत्र यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.





















