(ANI वृत्तसंस्थेचे साभार) 🙏🙏🙏🙏
मुंबई ! चेंबूर परिसरात मध्यारात्रीनंतर दरड कोसळल्याने अकरा जण मृत्यूमुखी पडले आहेत. ही दरड खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. तर, येथे ढिगार्याखाली काही जण अजून अडकून पडले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.
मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.






















