सोलापूर : 1 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता क्रांतिवीर जय लहुजी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त जय मल्हार नगर बाळे येथे विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
प्रथमतः साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे व माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर आदी जांबमुनी मराठी शाळा,जय मल्हार नगर बाळे येथे शालेय विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास दैनिक पुण्यनगरीचे संपादक भरतकुमार मोरे, उत्तम कांबळे, नानासाहेब मोरे व संस्थेचे संस्थापक सुरज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमास मुख्याध्यापक संतोषकुमार घोडके, शिक्षक वर्ग देविदास माने,रेश्मा शेख, शैलजा वाघमोडे, सुरवसे आदींचे मोलाचे योगदान लाभले.
यावेळी क्रांतिवीर जय लहुजी प्रतिष्ठानचे उत्सव अध्यक्ष विनोद बोराडे, यश कांबळे, अतुल कांबळे, आशपाक मुजावर, राहुल कांबळे, शुभम जाधव व क्रांतिवीर जय लहुजी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी आकाश कांबळे, अभिजित जाधव आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोवर्धन माने यांनी केले व आभार प्रदर्शन विश्वास गजभार यांनी केले.