सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती, यापूर्वी दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली होती, शुक्रवारी होणाऱ्या सभेसाठी सभापती डोंगरे सह, ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख, भारत आबा शिंदे, अंजनादेवी पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिह पवार, बांधकाम कार्यकारी अभियंता कदम हे उपस्थित होते, अर्थ समिती असल्याने सर्व विभागाच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते,
मात्र ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, शिक्षण अधिकारी संजय राठोड, समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव हे काही महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते, त्यामुळे चिडलेल्या सभापती विजयराज डोंगरे हे सभात्याग करत बाहेर पडले त्यामुळे गुरुवारची सभा ही तहकूब करण्यात आली. जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सभापती विजयराज डोंगरे यांच्या चेंबरमध्ये गेले, सभा झाली का नाही ही विचारणा केली तेव्हा त्यांनी, सभा तिसऱ्यांदा तहकूब झाल्याचं सांगितलं.
यावेळी ज्येष्ठ सदस्य भारत आबा शिंदे सदस्य वसंत नाना देशमुख हे तिथे उपस्थित होते आम्हाला विभागाच्या खर्चाची माहितीच मिळत नसेल तर सभा कशाला घ्यायची? कोणकोणत्या कामांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या हे सुद्धा सध्या समजत नाही. कोणत्या विभागाचा किती खर्च झाला याची माहिती मिळत नसेल तर सभा घेण्यात काय ‘अर्थ’. ग्रामपंचायत विभागांमध्ये नागरी सुविधा जनसुविधा विभागाचा मोठा निधी आला आहे, किती कामाच्या प्रशासकीय मान्यता झाल्या याची माहिती मिळत नाही, चंचल पाटीलबाई ऑफिसमध्ये बसतात, सभेला येत नाहीत, सीईओ दिलीप स्वामींना काही देणे घेणे दिसत नाही. आरोग्य विभागामध्ये किती खर्च केला गेला हे समजत नाही आरोग्य विभागामध्ये तर तब्बल 1 कोटीची औषधे जाळली गेल्याची माहिती मिळत असल्याचा थेट आरोप भारत आबा शिंदे यांनी केला आहे.
समाज कल्याण विभाग मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत किती कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या हे सुद्धा अद्याप समजले नाही. अर्थ समिती तहकूब झाली असली तरी येणार्या 26 जुलै रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे त्यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, समाज कल्याण विभाग हे आमच्या रडारवर राहतील असा इशारा विशेष करून वसंत नाना देशमुख यांनी दिला. या सभेमध्ये पंढरपूरचे गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.



















