सोलापूर : अनेक वर्षापासून रखडलेल्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज सुरू झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भावनाचे उद्घाटन झाले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबर मध्ये जाऊन काही वेळ ते खुर्चीवर बसले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपले स्वतःचे कार्यालय पहिल्या ऐवजी दुसऱ्या मजल्यावर नेले. कार्यालय सुरू झाल्यावर शंभरकर हे एक महिन्याच्या नंतर कार्यालयात आले.
त्यांच्या कार्यालयाचे फिनिशिंग वेगळ्याच पद्धतीने करण्यात आले होते, भिंतींचा रंग हा तर कार्यालयाला शोभत नव्हता, आपण एका स्विमिंग पुलामध्ये आलोत का असे फिलिंग होत होते, त्याची बरीच चर्चा झाली. आतील खुर्च्याही व्यवस्थित नाहीत, अशातच शंभरकरांची बदली झाली, त्यांच्या जागेवर गडचिरोली हून कुमार आशीर्वाद हे नवे कलेक्टर म्हणून आले. त्यांनी जेव्हा मिलिंद शंभरकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला तेवढ्या एकच दिवस ते त्या दालनामध्ये बसले.
त्यानंतर मात्र ते आपले कामकाज मिटिंग हॉलमध्ये बसूनच करू लागले. एकदाही त्यांनी त्या दालनाचा वापर केला नाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल आणि मीटिंग हॉल यामध्ये बसूनच त्यांनी आजपर्यंत कामकाज केले आहे. जो मिटींग होता त्या हॉलला त्यांनी आता स्वतःचे कार्यालय करून घेतले आहे. त्या ठिकाणी बराच बदल करण्यात आला आहे. खुर्च्या बदलण्यात आल्यात, टेबल बदलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी बसतात त्यामागे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर या नावाचे बोर्ड बसवण्यात आले आहेत सध्या ते कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत असून आज गेल्यानंतर मंत्रालयात गेल्यासाखी फिलिंग होत आहे.