सोलापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी सोलापुरातील मुस्लिम संघटना संस्था समाज बांधव तसेच सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
त्या आवाहनाला उदंड असा प्रतिसाद मिळाला. सर्व पक्षीय नेत्यांनी आपापले पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या मोर्चात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या मोर्चात फारूक शाब्दी यांचे राजकीय विरोधक समजले जाणारे तोफिक शेख तसेच काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, स्वतः शहर काझी अमजद अली काझी, जमियत ए उलेमा तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हा मोर्चा यशस्वी केल्याबद्दल फारूक शाब्दी यांनी सर्व सोलापूरकरांचे तसेच पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहेत..
दरम्यान हा मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी संबंधित प्रवृत्तींना अटक व्हावी यासाठी हा जनसमुदाय उसळला होता मुस्लिम समाज या मोर्चाच्या आडून एकवटला हा निषेधाचा मोर्चा होता मात्र फारूक शादी यांनी आपल्या गाडीवर चढून तसे निवडणुकीच्या प्रचारामध्ये जनतेला हात वर करून अभिवादन करतो कशा पद्धतीने त्यांनी हावभाव केले. याबाबत मुस्लिम समाजातील पत्रकारांनी सुद्धा शाब्दी यांच्या या प्रकारावर तीव्र अशी नाराजी व्यक्त करत हे वागणं योग्य नव्हते अशी प्रतिक्रिया समोर आली.