उत्तर सोलापूर तालुक्यातील गावात असलेल्या सीना नदीवर ब्रिज कम बंधारा याचे भूमिपूजन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला राजकीय रंग दिसून आला. दरम्यान या कार्यक्रमावर गावातील माजी आमदार दिलीप माने यांचे कार्यकर्ते अजय सोनटक्के यांनी जोरदार टीका केली. कार्यक्रमाची इतकी घाई का होती गावच्या सरपंचांना ही निमंत्रण दिले नाही, सीना नदी मध्ये पाणी सोडण्यासाठी दिलीप माने कायम प्रशासनाशी भांडतात, आंदोलने करतात,गुन्हा अंगावर घेतात, बापू मात्र फुकटचे श्रेय लाटतात या भाषेत सोनटक्के यांनी जोरदार टीका केली दरम्यान ते काय म्हणाले पाहूया..


















