सोलापूर । बुधले गल्ली, बाळीवेस परिसरातील निर्मला बाबुराव विभूते (वय ६७) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता रुपा भवानी मंदिर रस्त्यावरील रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दै. दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक रामेश्वर विभूते, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश समन्वयिका वैशाली गुंड, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील प्राध्यापिका शैफाली विभूते (बारबोले) यांच्या त्या मातोश्री होत.