सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी स्मिता पाटील यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
लोकशासन आंदोलन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव तसेच बीबी दारफळ गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी ननवरे यांनी डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांचा सत्कार करत शूभेच्छा दिल्या.