सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा ही मंगळवारी महापौर श्रीकांचना यंनम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सावित्रीबाई फुले सभागृहात बोलावण्यात आली होती, सभा सुरुवातीला सुरू झाली, सभेला उपमहापौर राजेश काळे, आयुक्त पी शिवशंकर, सभागृहनेता शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व इतर गटनेते बैठकीला उपस्थित होते.
मात्र काँग्रेस नगरसेवक बाबा मिस्त्री, यु एन बेरिया, एमआयएम नगरसेवक तौफिक शेख, वंचितचे गणेश पुजारी, नगरसेविका वाहिदाबी शेख, शाजिदाबानो शेख यांनी महापौर कार्यालयासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली महापालिका सभा ही ऑफलाईन पद्धतीने झाली पाहिजे, आयुक्तांचा निषेध नोंदवण्यात आला. नंतर सर्व नाराज सदस्यांनी महापौरांची भेट घेतली यावेळी ज्येष्ठ नगरसेवक यु एन बेरिया, तौफिक शेख, बाबा मिस्त्री, रियाज खरादी, किसन जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अक्कलकोट म्हणजे “कल्याणशेट्टी जनता पार्टी”(केजेपी) ; भाजप नेत्याचा थेट आरोप, म्हणूनच आमचा विरोध
आपली भावना व्यक्त करताना त्यांनी, आज आम्ही सभेसाठी महापालिकेत आलो, गेटवर अडवण्यात आले, आम्ही काय आरोपी आहोत का?गुन्हेगार आहोत का? तसे असेल तर आमची अरेस्ट वारंट काढा असा संताप व्यक्त करत आपल्या कडे हजार लोक बसण्याची व्यवस्था असणारे सभागृह आहे, दहा खुर्ची मागे एक सदस्य बसू शकतो मग सभा ही खुल्या जागेत का घेत नाही, ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा हट्ट का? सर्व बैठका ओपनमध्ये होतात आपलीच सभा का ऑनलाइन पद्धतीने.
येणारी बजेट सभा आहे, त्यात सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे, कोरोनाचे सर्व नियम पाळत, कोरोना टेस्ट करून घ्या पण सभा ही नियोजन भवन अथवा हुतात्मा स्मृती मंदिरात घ्या, विधानसभा अधिवेशन चालते, पुण्यात जिल्हा नियोजन समिती बैठक होते पण आपली सभा का नाही?
माझा कोणताही वैयक्तिक इंटरेस्ट नाही, माझी पण अपेक्षा आहे सभा खुल्या मध्ये घ्यावी, मी शासनाला विनंती केली आहे, असे महापौर यंनम म्हणाल्या. मी तुमच्या सूचना शासनाला कळवतो जे आदेश येतील ते आपणास कळवले जाईल असे आयुक्त शिवशंकर म्हणाले.


















