सोलापूर : संभाजी आरमार संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्मार्ट सिटी योजनेच्या जीवघेण्या आणि नियोजनशून्य कारभाराविरोधात नागरिकांचे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली,
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, अनंतराव निळ, संजय सरवदे, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे , सागर संगवे, अनिल छत्रबंद, सागर ढगे,सोमनाथ मस्के, गोपी पुराणिक, सुधाकर करणकोट, सागर दासी, गिरीश जवळकर, प्रवीण मोरे, राजु रच्चा संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी अध्यक्ष डांगे यांनी स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला डेंगळे पाटील हे मस्तवाल तर आहेच मात्र त्यांना अभियांत्रिकीचा कोणताही अनुभव नाही अशा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली…



















