सोलापूर ! हेरिटेज मंगल कार्यालय, गांधी नगर, सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेळावा व पक्ष प्रवेश करीता बेकायदेशीर जमाव जमवुन, लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत बेकायदेशीर विनापरवाना, सोशल डिस्टंसिंग दोन व्यक्ती मध्ये पुरेसे सामाजिक अंतर न ठेवता एकत्रित जमाव करुन पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असताना कोरोना या धोकादायक आजाराच्या विषाणुचा संसर्ग होवून जनहित धोक्यात येवून, नागरीकांच्या जिवीतास गंभीर धोका निर्माण होईल अशा प्रकारचे विषाणुचा प्रादुर्भाव होणेस जाणिवपुर्वक कृत्य करीत असताना मिळुन आले आहेत म्हणून १) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, २) शहर अध्यक्ष भारत जाधव, ३) महिला अध्यक्ष सुनिता दादाराव रोटे, ४) युवक अध्यक्ष जुबेर बागवान, ५) मनोहर सपाटे, ६) अदनान तौफिक शेख, ७) अजित बनसोडे, ८) इरफान महबुब शेख, ९) प्रसन्नजित प्रमोद गायकवाड, १०) इक्बाल हुसेन शेख, ११) मनोज कांतीलाल शहा यांच्या विरुद्ध भादंविसंक १४३, १८८, २६९,३३६, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब), भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ प्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















