सोलापूर : सोलापुरात गणेश उत्सव आणि नुकताच नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवरात्र महोत्सवात मात्र जुळे सोलापूर भागात दक्षिण सोलापूर मतदार संघाच्या भावी आमदारांमध्ये चांगलाच डिजिटल वर पाहायला मिळाला. संपूर्ण जुळे सोलापूर परिसरातील चौका चौकात डिजिटल लावणी गेले होते. नागरिकांना राजकीय नेत्यांमधील एक प्रकारचा डिजिटल वॉर दिसून आला.
दक्षिणचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील व मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे संतोष पवार यांचेच डिजिटल पाहायला मिळाले.
जुळे सोलापूर भागात यंदा भव्य अशा दांडिया स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुभाष देशमुख आणि दिलीप माने यांनी मोठ्या स्पर्धा घेऊन लक्ष वेधले. ज्या मैदानावर दिलीप माने यांच्या चिरंजीवांचे लग्न झाले होते त्याच मैदानावर सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने मोठा दांडिया गरबा घेण्यात आला. हजारो महिलांनी यात सहभाग नोंदवला. दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जगदीशश्री मंगल कार्यालय या ठिकाणी दांडिया स्पर्धा घेऊन या भागातील महिलांचा उत्साह वाढवला. आसरा चौक परिसरात बऱ्याच ठिकाणी काँग्रेस नेते सुरेश हसापूरे यांचे गणेशोत्सव आणि नवरात्र निमित्त डिजिटल दिसून आले. आता तर सुरेश हसापुरे यांनीही दांडिया गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शिवसेना नेते अमर पाटील यांनी मात्र यावेळी जुळे सोलापूर परिसरात आपले सर्वाधिक डिजिटल लावले होते आणि विशेष म्हणजे या डिजिटल वर पाटील यांचा ‘भावी आमदार’ म्हणून उल्लेख झाला. या डिजिटल ची सुद्धा या भागात चर्चा ऐकायला मिळाली, मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे संतोष पवार हे सुद्धा दक्षिणमधून इच्छुक असल्याचे बोलले जाते त्यांचेही नवरात्र उत्सवाचे डिजिटल ठिकठिकाणी पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभर वेळ असताना आतापासूनच दक्षिणच्या संभाव्य उमेदवारांमध्ये नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा रंगू लागली आहे त्यामुळे येणारी निवडणूक निश्चितच चुरशीची राहील याचे संकेत आतापासूनच दिसू लागले आहेत.