सोलापूर ! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शनिवारी दौरा झाला, अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रुसले, फुगले, अनेक जण खुश झाले, सोलापूरात एनसीपीची पॉवर दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे या दौऱ्यातून दिसून आले. जयंत पाटील तसे राष्ट्रवादी काँग्रेस मधील वजनदार आणि दमदार नेते, माध्यमांशी बोलताना ते सावध बोलतात, समोरून प्रश्नाचें बॉल कसे येतात त्या पद्धतीने ते बॅटिंग करतात, त्यांच्या उत्तरांमधून पवार साहेबांची झलक दिसते, शनिवारी हेरिटेज याठिकाणी पत्रकार परिषद सुरू होती, पत्रकार परिषद ऐन रंगात आली असताना समोरून ग्रामीण ढंगात एक प्रश्न आला केंद्रात सहकार मंत्रालय नव्याने तयार झाले आहे, सहकार क्षेत्र महाराष्ट्र आणि गुजरात मोठ्या प्रमाणात असल्याने याचा काय परिणाम होईल ? प्रश्नांची स्टाईल पहात तुम्ही पत्रकार आहेत का?लगेच त्यांनी विचारले तेव्हा समोरून नाही उत्तर आले,मी या प्रश्नाचे खाजगीत उत्तर देईन असे जयंत पाटील म्हणाले, यावरून जयंतरावांचा चाणाक्षपणा दिसून आला, पहा हा व्हिडीओ
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...


















