मोहोळ : मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडून नुकतीच पार पडली. यामध्ये जनतेतून सरपंच पदाची निवड झाली. परंतु उपसरपंच पदाची निवड ग्रामपंचायत सदस्यातून होणार आहे. मलिकपेठ ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवड येत्या 24 तारखेला होणार आहे. यासाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्यांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. परंतु संबधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या व्यक्तीलाच नोटीस काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नुतून ग्रामपंचायत सदस्य झालेल्या सदस्याचे नाव नागेश औदुंबर हजारे असून संबधित अधिकाऱ्यांनी नागेश औदुंबर आवारे नावाने नोटीस काढली आहे. त्यामुळे नूतन ग्रामपंचायत सदस्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नूतन ग्रामपंचायत सदस्य नागेश औदुंबर हजारे यांनी केली आहे.
संबधित अधिकाऱ्यांनी नूतन सदस्याना काढलेल्या नोटीस मध्ये म्हंटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक जिल्हाधिकारी सोलापूर अधिसूचना क्र.सा.वी./ग्रा. पं./१/आर आर /८१८/२०२३ दी. ०९/११/२०२३ नुसार उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या जागेकरिता यथोचितरित्या निवडून आल्याचे अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आलेले आहे.
त्यानुसार उपसरपंच पदाची निवडणूक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३३ मधील तरतुदीनुसार शुक्रवार दिनांक २४/११/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. ते दुपारी ०२.०० ते निवड संपेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय मलिकपेठ ता.मोहोळ जि.सोलापूर येथे सरपंच गणेश मधुकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी आपण सभेस (सभेच्या नोटीस सह) वेळेवर उपस्थित राहावे. अशा आशयाची नोटीस काढली आहे. परंतु नूतन ग्रामपंचायत सदस्य नागेश औदुंबर हजारे असताना नागेश औदुंबर आवारे नावाने नोटीस काढण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामसेवक नोट रीचेबाल
संबधित नोटीस बद्दल मलिकपेठ ग्रामपंचायत ग्रामसेवकांना फोन केला असता ते नोट रीचेबल होते.