सोलापूर : शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तथा माजी मुख्याध्यापक राजा बागवान यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या उपस्थितीत बागवान यांचा पक्षात प्रवेश झाला. शाब्दि यांनी त्यांचे स्वागत करत एमआयएम पक्षाचा शेला त्यांच्या गळ्यात घातला.
यावेळी जनरल सेक्रेटरी तथा प्रवक्ते कोमारोह सय्यद, माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, माजी नगरसेविका वाहिदा भंडाले, नसीम खलिफा, शकील शेख, सत्तार पैलवान, हरीश कुरेशी, अश्फाक बागवान, युसूफ एमआर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर अध्यक्ष शाब्दी यांनी राजा बागवान यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच पक्षाला फायदा होईल. एम आय एम पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बागवान यांनी फारूक शाब्दि यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण एमआयएम पक्षात आल्याचे सांगितले. ते जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत आपण राहू ते जेव्हा पक्ष सोडतील तेव्हा आपण पक्ष सोडू असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला आपला सोलापुरात आमदार का होऊ शकत नाही? असा प्रश्न केला. यासाठी समाजाने आत्मचिंतन करावे, एकत्र यावे आणि आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले.