सोलापूर ! काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या मागील अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात ठाण मांडून आहेत, त्यांनी शहरात गाठी भेटी सह विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे, नुकतंच त्यांनी अल्पसंख्याक विभागा अंतर्गत मुस्लिम समाजातील प्रमुख 300 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीत मुस्लीम समाज पक्षापासून दूर का होतोय यांचे चिंतन करण्यात आले, काँग्रेस भवनामध्ये शहर कॉंग्रेस कमिटी ब्लॉक, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांच्या रोजच्या रोज बैठका सुरू आहेत, कोविड योध्दयांचा सत्कार करून एक चांगला संदेश देण्यात आला. राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याने तिन्ही पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे, काँग्रेसने मात्र भारतीय जनता पक्ष व विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.
शुक्रवारी आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी संदर्भात सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी ब्लॉक, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, विशेष उपस्थिती जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर U.N. बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल लोटस येथे संपन्न झाली. या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आगळ्यावेगळ्या पोस्टरचे लॉन्च काँग्रेसने केले, यामध्ये मोदी यांना bluffmaster म्हणून संबोधण्यात आले असून अच्छे दिन आने वाले थे अशी टॅग लाईन देण्यात आली आहे.
या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी एल्गार करताना महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच असा विश्वास देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून “कर हर मैदान फतेह” म्हणून कामाला लागण्याचे आवाहन केले.
या बैठकीस जेष्ठ नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवीताई करगुळे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, उदयशंकर चाकोते, सरचिटणीस मनीष गडदे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उदयोग वाणिज्य सेलचे पशुपती माशाळ, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, कामगार सेलचे सायमन गट्टू, श्रद्धा आबुटे, प्रियांका डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



















