Solapur ! नई जिंदगी भागातील भीमाशंकर नगर इथल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवार 18 जुलै रोजी घडली .मुलीच्या वडिलांकडून या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे वडील हे रिक्षाचालक असून त्यांची 15 वर्षाची मुलगी ही दहावी पास झाली होती, 18 जुलै 2021 रोजी फिर्यादी हे पहाटे रिक्षा घेऊन रेल्वे स्टेशनला भाडे मारण्यासाठी गेले होते,काही वेळातच त्यांच्या पत्नीचा फोन आला आपली मुलगी पहाटे साडे पाच पासून घरात नाही.
मुलीकडे असलेल्या मोबाईल वर कॉल केला असता तो स्विच ऑफ लागला, त्यानंतर तिचा नई जिंदगी रेल्वे स्टेशन, एस टी स्टँड, जुना घरकुल, नवीन घरकुल परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही, तिच्या मैत्रिणीं व नातेवाईकांना संपर्क साधला असता ती कुणाकडे नव्हती, शेवटी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम 363 अन्वये अज्ञात इसम विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



















