सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
त्या पत्रात, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली येथे मागील ४ ते ५ दिवसांपासून उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाने ठिकठिकाणी साखळी उपोषण, सर्वपक्षीय राजकीय व्यक्तींना गाव बंदी अशा विविध मार्गाने आरक्षणाचा लढा चालू आहे. तरी आपणांस विनंती की, त्यांचे उपोषण सोडविण्याच्या दृष्टीने तात्काळ प्रयत्न व्हावेत.
मी मराठा समाजाचा घटक या नात्याने समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस माझा पाठिंबा असून तातडीने विधानमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे व कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकेल असे सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी आपणांस विनम्र व कळकळीची विनंती आहे.