सोलापूरच्या शासकीय पॉलिटेक्निकमधे अनेक मुले मुली शिक्षण घेत आहेत परंतु मुलींच्या वसतिगृहामध्ये अनेक अडचणी आहेत. या ठिकाणी फॅन, ट्युब, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ मशिन असे अनेक सोयी सुविधा नव्हत्या. शासनाचा निधीही वेळेवर मिळत नसल्याने तेथील सर्व मुली एकत्रित येऊन ही तक्रार प्रोफेसर राजेश्री पाटील (भोळे) यांच्याकडे मांडली.
पाटील यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना ही अडचण सांगितली असता त्यांनी तातडीने मुलींच्या वसतिगृहासाठी 12 फॅन, 12 LED बल्ब, 12 ट्युब, एक वाटर फिल्टरची आर ओ मशीनची सोय केली. प्राचार्यांच्या दालनात आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस नेते सुरेश हसापूरे यांच्या उपस्थितीत हे सर्व साहित्य प्राध्यापिका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी हॉस्टेल मधील विद्यार्थिनी उपस्थित होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता. ताई तुमच्यामुळेच हे कॉलेज सोलापुरात राहिले, आज तुम्हीच आमच्या मदतीला आलात असे भावनिक उद्गार मुलींच्या तोंडून निघाले.