सोलापूर : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी स्वागत केले. त्यानंतर भाजपचे नेतेमंडळी रांगेत हातात गुलाब पुष्प घेऊन थांबली होती त्यामध्ये ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते, आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, प्रदेश नेते शहाजी पवार, धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतन केदार, प्रणव परिचारक यांच्यासह भाजपचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पहा तो व्हिडिओ….