हा तर प्रत्येकाच्या अंत:करणातला ‘ राम ‘ आहे ! आजोबा म्हणाले, ”दिल सच्चा और चेहरा झुठा…” : पहा व्हिडिओ
सोलापूर : तरुण, तडफदार आणि विकासाची जाण असलेले आमदार राम सातपुते हे जणू प्रत्येकाच्या अंतःकरणातील रामच आहेत. सोलापूरकरांनी अशा काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया शेळगी येथील एका आजोबांनी व्यक्त केली.
भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या, भाजपा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या भेटींदरम्यान आमदार राम सातपुते शेळगी येथे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी त्यांचा शेळके आणि परिसरातील नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुराव नरूणे आदी उपस्थित होते.
शेळगी येथील ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे (वय ८०) हे देखील आमदार राम सातपुते यांचा संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. यावेळी अशोक बुरांडे यांनी जोरदार उत्साही भाषण करुन उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, आमदार राम सातपुते यांना विकासाची जाण आहे. जणू प्रत्येकाच्या अंत:करणात असलेला हा राम आहे. सोलापूरकरांनी विकासाची कामे करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच देशाचा आणखी प्रचंड मोठा विकास होणार आहे. यावेळी त्यांनी जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपटगीताचे बोल आपल्या खास शैलीत बोलूनही दाखवले. “दिल को देखो चेहरा न देखो, चेहरेने लाखो को लूटा, दिल सच्चा और चेहरा झुठा” असे ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी सादर केलेले हे चित्रपटगीताचे बोल कोणासाठी होते, हा टोला कोणासाठी होता ? याची चर्चा आता संपूर्ण सोलापूर लोकसभेत चांगलीच रंगू लागली आहे.