Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील अडचणीत ; अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 January 2024
in crime
0
सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील अडचणीत ; अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
0
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील अडचणीत ; अकलूज पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल

सोलापूर : अकलूजमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने  शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आठजणांविरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोघांना अटक झाली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.

अभिजीत उत्तम केंगार (वय २१, रा. वाघोली, ता. माळशिरस) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते-पाटील (वय ४५) यांच्यासह गिरझणी गावचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर (वय ५२) व माजी सदस्य मयूर नवनाथ माने (वय ३३),  हिरा रामचंद्र खंडागळे (वय ३०, रा.महर्षी काॕलनी, अकलूज) आणि इतर अनोळखी चार साथीदारांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (भारतीय दंड संहिता कलम ३०४,३२४, ३४) दाखल झाला आहे. यातील सतीश पालकर व मयुर माने यांना अटक झाली असता त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृत अभिजीत केंगार हा गेल्या १८ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यात शिरला. तो  चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड  काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यात बेशुध्द पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला असता गुन्हा निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सांगितले.

पुढील तपास अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील करीत आहेत. धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. (साभार- लोकसत्ता)

Tags: Akluj police stationCongressDhavalsinh mohite patilSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! सोलापूर ग्रामीणच्या 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; कुणाला कुठे हलवले ?

Next Post

महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न ; राम मंदीर उत्सव रॅलीवर हल्ला करणाऱ्या परिसरात ‘बुल्डोजर बाबा’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न ; राम मंदीर उत्सव रॅलीवर हल्ला करणाऱ्या परिसरात ‘बुल्डोजर बाबा’

महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न ; राम मंदीर उत्सव रॅलीवर हल्ला करणाऱ्या परिसरात ‘बुल्डोजर बाबा'

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group