मोहोळ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेना जोरदार धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोळा ही आमदार पात्र ठरवले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. ठिकठिकाणी निदर्शने तसेच पोस्टर जाळणे असे आंदोलन केले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात महिला आघाडीच्या नेत्या सीमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या निकालावर तीव्र संताप व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पोस्टर जाळून निषेध नोंदवला.
सीमा पाटील यांनी शिवसेना केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. कुण्याही आयऱ्यागयऱ्याची नाही, आम्ही फक्त आता निवडणुकीची वाट पाहत आहोत जनताच या लोकांना धडा शिकवेल या शब्दात आपली भूमिका मांडली.