Saturday, August 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन बंद ; मुखदर्शन सुरु राहणार या वेळेत ; विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 March 2024
in धार्मिक
0
पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन बंद ; मुखदर्शन सुरु राहणार या वेळेत ; विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच
0
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन बंद ; मुखदर्शन सुरु राहणार या वेळेत ; विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच

पंढरपूर:- (दि.12), लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे जतन व संवर्धन करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता ही सर्व कामे होणार आहेत. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  दि.15 मार्च पासून गर्भगृहातील कामास सुरुवात होणार असल्याने  15 मार्च पासून पदस्पर्श  दर्शन बंद करुन पहाटे 5.00 ते  10.45 वाजेपर्यंत श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांनी दिली.

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गाभा-यातील संवर्धनाचे काम करताना मुर्तीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक प्रशासकीय अधिकारी व वारकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, मंदीर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, दूरदृष्यप्रणालीव्दारे ॲड.माधवी निगडे तसेच सल्लागार परिषदेचे प्रसाद अंमळनेरकर, विठ्ठल वासकर, अनिल अत्रे, वारकरी संघटनेचे संजय देहूकर.राणा महाराज वासकर, बापूसाहेब उखळीकर, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसिलदार सचिन लंगोटे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आर्किटेक्ट तेजस्विनी आफळे, कामाचे ठेकेदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आर्शीवाद म्हणाले,  मुर्तीस बुलेटप्रुफ दोन लेअरची काच लावून मुर्तीचे संरक्षण करण्यात येणार आहे. गर्भगृहातील काम सुरू असताना उडणारी धूळ बाहेर जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था संबंधित कंत्राटदारांने करावी. प्रत्येक दिवशी होणाऱ्या कामाची माहिती कंत्राटदराने रोजच्या रोज कळवावी. त्याचबरोबर ज्यादा मनुष्यबळाचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. तसेच मंदिर समितीने कामाचे पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करावे.मुखदर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोबाईल बंदी करावी. चैत्री यात्रा कालावधीत दिनांक 15 ते 21 एप्रिल 2024  पर्यंत भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार असून दर्शन बदलाबाबत सर्व वारकरी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी केले

यावेळी मंदीर समितीचे सह अध्यक्ष सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, दि.15 मार्च पासून गर्भगृहातील कामास सुरुवात होणार असल्याने  15 मार्च पासून श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पदस्‍पर्श दर्शन बंद असले तरी परंपरेनुसार श्रीचे नित्योपचार सुरू राहणार आहेत.भाविकांना श्रींच्या लाईव्ह दर्शनाची व्यवस्था मंदीर समितीकडून करण्यात येणार आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संपूर्ण कामाचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे. शेज आरतीनंतर गर्भगृहातील काम बंद ठेवण्यात येणार आहे. श्रीं.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-याचे संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचे प्रस्तावित असून, संबधित कंत्राटदाराने याची दक्षता घेवून काम वेळेत पुर्ण करावे  अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मंदीराचे मुळ रुप कायम ठेवून जतन व संवर्धनाचे काम करण्यात येत असून, मंदीरात लावण्यात आलेल्या चांदीचे कामही नव्याने करण्यात येणार असून, मंदिरातील सर्व चांदी काढून दुरूस्ती करून पून्हा बसविण्यात येणार आहे. पुर्वीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार भर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी समिती नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या सर्व कामाचे संपूर्ण  व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. गर्भगृहातील कामासाठी 15 मार्च पासून पदस्पर्श दर्शन  बंद ठेवण्यात असल्याने भाविकांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकामार्फत होणाऱ्या सर्व पूजा बंद असणार आहेत. तसेच  भाविकांना सहज व सुलभ मुखदर्शन घेता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना मंदीर समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील काम  करताना पदस्पर्श दर्शन बंद असल्याने मुख दर्शन व्यवस्था सुरु ठेवावी. तसेच कमी वेळेत मुखदर्शन मिळेल याबाबत नियोजन करावे. मंदीरात सुरु असलेल्या सर्व कामांचे चित्रीकरण करुन जतन करुन ठेवावे. मुर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे बॉक्स तयार करुन त्यामध्ये कॅमेरा बसवून मंदीर परिसरात एलईडी स्क्रीन व्दारे लाईव्ह दर्शन व्यवस्था करावी अशा सूचना उपस्थित महाराज व वारकरी संघटना यांनी यावेळी मांडल्या.

Tags: Collector kumar ashirwadPandharpurShree Vitthal Mandir
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार आला या पवारांकडे ; लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस श्रेष्ठींचा निर्णय

Next Post

युवराज जाधव काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती विभागाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
युवराज जाधव काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती विभागाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष

युवराज जाधव काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती विभागाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष

ताज्या बातम्या

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994035
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group