Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोहिते पाटील- शिंदे घराण्याचे ऋणानुबंध भाजपच्या रामाला डोकेदुखी  ; आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोहिते पाटील ‘प्लस पॉईंट’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 April 2024
in political
0
मोहिते पाटील- शिंदे घराण्याचे ऋणानुबंध भाजपच्या रामाला डोकेदुखी  ; आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोहिते पाटील ‘प्लस पॉईंट’
0
SHARES
458
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहिते पाटील- शिंदे घराण्याचे ऋणानुबंध भाजपच्या रामाला डोकेदुखी  ; आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोहिते पाटील ‘प्लस पॉईंट’

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या नावावर चालते ते मोहिते पाटील घराणे आणि सोलापूर शहरात यांचा दबदबा आहे अशा सुशीलकुमार शिंदे या दोन्ही कुटुंबियांचे पुन्हा ऋणानुबंध अधिक घट्ट झाले आहेत. हे निश्चितच भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि  रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मात्र मोहिते पाटील हे प्लस पॉइंट असल्याचे बोलले जाते.

oplus_1026

एकाच वेळी राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला दिला आहे तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसने ते सुशीलकुमार शिंदे आणि तात्कालीन उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील या दोन नेत्यांनी एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा चालवला आहे. जरी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी या दोघांमध्ये तेवढाच समन्वय होता त्यावेळी सोलापूर जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा नंतर सोलापूरचे राजकारण बदलत गेले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचाही पराभव झाला. जिल्ह्याची सत्ता समविचारी आघाडीच्या ताब्यात गेली नंतर अशा घडामोडी घडल्या की विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये जावे लागले परंतु सुशीलकुमार शिंदे काँग्रेसमध्येच ठाम राहिले.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोहिते पाटील गटाची मोठी ताकद आहे. सोलापूर शहरात ही मोहिते पाटील गट पाहायला मिळतो. मागील पाच वर्ष भाजपमध्ये राहिलेले मोहिते पाटील घराणे यंदा लोकसभा निवडणुकीत धर्यशील मोहिते पाटील यांना उतरवण्याचा मनोदय केला होता परंतु भाजपने त्यांच्या आशेवर पाणी फेरले माढयाच्या शिंदे घराण्याच्या जोरावर त्यांनी पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली पण आपला माणूस म्हणून माढा लोकसभा मतदारसंघात ओळख झालेल्या धर्यशील मोहिते साठी कार्यकर्ते धावले. काही होऊ दे यंदा तुतारी वाजवायचीच असा निश्चय केला  शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक ठरली त्या बैठकीला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आले. विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये बैठकी झाली. ही राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्यासह पुणे व सातारा जिल्ह्यात अनेक समीकरणे बदलणारी होती. ती बैठक सोलापूरच्या काँग्रेसला ताकद देणारी ही होती.

यानंतर मंगळवारी धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज भरण्याचे ठरले जिल्हाधिकारी कार्यालय सुशीलकुमार शिंदे यांच्या घराच्या केवळ शंभर मीटर अंतरावर त्यामुळे मोहिते पाटील यांना जनवात्सल्य निवासस्थानी दुपारच्या जेवणाचे निमंत्रण दिले, यात सध्या सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे असलेल्या चाणक्य डोक्याच्या हसापुरे यांचा रोल महत्त्वाचा ठरला.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळता संपूर्ण मोहिते पाटील घराणे सुशीलकुमार यांच्या निवासस्थानी आले. अतिशय कौटुंबिक वातावरणात आदरातिथ्य करण्यात आले.  शिंदे यांचे संपूर्ण कुटुंब मोहिते पाटील कुटुंबाच्या स्वागताला होते. या बैठकीनंतर मोहिते पाटील आणि शिंदे घराण्याचे ऋणानुबंध अधिकच जुळण्याचे पाहायला मिळाले याचा फायदा निश्चितच प्रणिती शिंदे यांना होणार असून यामुळे काँग्रेसची सोलापूर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली हे कोणालाही नाकारता येणार नाही.

Tags: @sushilkumar shindeBJP vs mohite patilMLA Ram satputePraniti Shindeधैर्यशील मोहिते पाटील
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याने भारतीय जनता पार्टीत उत्साह संचारला !

Next Post

अन्.. राम सातपुते यांनी वाढवला राम भक्तांमध्ये उत्साह

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अन्.. राम सातपुते यांनी वाढवला राम भक्तांमध्ये उत्साह

अन्.. राम सातपुते यांनी वाढवला राम भक्तांमध्ये उत्साह

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001463
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group