आमदार देवेंद्र कोठे शहराच्या पाणीपुरवठया वरून डीपीडीसीत आक्रमक ; महापालिका प्रशासनावर संताप
सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी पुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. समांतर जलवाहिनीच्या अजून किती दिवस लागतील, ही जलवाहिनी झाली तरी आठ दिवसा आड पाणी का? शहराच्या पाणी प्रश्र्नी महत्त्वाचे अनेक मुद्दे मांडले.
या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आणि महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या उत्तरावर ते असमाधानी दिसून आले. पहा काय म्हणाले कोठे…