“तुम्हाला लाज कशी नाही वाटली” प्रणिती शिंदे यांच्या त्या वक्तव्याचा ज्योती वाघमारे यांनी घेतला समाचार
सोलापूर ; राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका करताना सरकार महिलांना लाच देत असल्याचा आरोप केला होता.
या वक्तव्यावर बरीच टीका झाली परंतु विजयादशमी सणाच्या दिवशी मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. प्रणिती शिंदे यांना असे बोलताना लाज कशी वाटली नाही या शब्दात त्यांनी तोफ डागली. प्रणिती शिंदे यांच्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे व रश्मी ठाकरे यांनाही त्यांनी फैलावर घेतले, पहा यावेळी ज्योति वाघमारे काय म्हणाल्या…